लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडचे उपविभागीय अधिकारी बरडे यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलीस ठाण्यात महिलांचा जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान महिलांसाठी कबड्डी, भावगीत, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला भामरागड तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सहा.पोलीस निरीक्षक अंजली राजपूत, भारती इष्टाम, रमा टेंभूर्णे, रूपा हलदार, शिला येम्पलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी आपली क्षमता सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे. महिलांनी आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन एसडीपीओ बरडे यांनी केले. संचालन पोलीस शिपाई ममता कुमरे यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक बैसाने यांनी मानले. यशस्वीतेसाठी पीएसआय राळेभात व पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.
कबड्डीसाठी महिला मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:14 PM
भामरागडचे उपविभागीय अधिकारी बरडे यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलीस ठाण्यात महिलांचा जनजागरण मेळावा घेण्यात आला.
ठळक मुद्देजनजागरण मेळावा : क्षमता सिद्ध करण्याचे महिलांना आवाहन