स्नेहमिलन साेहळ्यानिमित्त महिलांसाठी वन मिनिट गेम, सांस्कृतिक कार्यक्रम, फुगे फुगविणे, गीतगायन स्पर्धा, मनाेरंजनात्मक उखाणे आदी कार्यक्रम घेऊन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या काेसरे कलार समाजातील प्रणिता सदाशिव बन्साेड हिचा समाजाच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिलांनी तीळगूळ देऊन भेटवस्तूंची देवाण-घेवाण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजा आत्राम, संचालन अलका बावनथडे तर आभार रिया दरवडे यांनी मानले. कार्यक्रमाला नलिनी कवाडकर, ज्याेती आत्राम, कल्पना मुंगनकर, नीलिमा महाजन, पुष्पा बन्साेड, माधुरी दखणे, राेहिणी बावनथडे, ज्याेती उईके, पूनम उईके, अर्चना ठलाल, चंद्रभागा उईके, शाेभा महाजन, कल्पना मांडवे, मीना बन्साेड, नंदिनी दखणे, रंजू मेश्राम, प्रविणा पाटणकर, सुषमा बाेरकर, प्रभा बाेरकर, कुंदा बाेरकर, रिना उईके, सुनीता बन्साेड, सुषमा दखणे, दीपिका दरवडे, ज्याेत्स्ना बन्साेड, श्रुती मांडवे, वैशाली मेश्राम, प्रीती पाटणकर, जयश्री लाडे, लता मेश्राम, नलिनी मुंगनकर, प्रतिभा बाेरकर, दीपा देशमुख उपस्थित हाेते.