शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कर वसुलीत कोरची नगर पंचायत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:56 AM

सन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या एकमेव नगर पंचायतींनी १०० टक्के मालमत्ता व पाणी कर वसुली करून..

दुसऱ्या स्थानी चामोर्शी, कुरखेडा : मालमत्ता व पाणीपट्टीदिलीप दहेलकर गडचिरोलीसन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या एकमेव नगर पंचायतींनी १०० टक्के मालमत्ता व पाणी कर वसुली करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत दुसऱ्या ठिकाणी चामोर्शी नगर पंचायत असून पाणी कराच्या वसुलीत दुसऱ्या स्थानी कुरखेडा नगर पंचायत आहे. मालमत्ता व पाणी कर हे नगर पालिका व नगर पंचायतीचे मुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. शहरातील नागरिकांना दिवाबत्तीची सोय, पाणी पुरवठा व इतर पायाभूत सुविधा पुरविण्याच्या कामास्तव शहरवासीयांकडून पाणी व मालमत्ता कर आकारले जाते. भाजप्रणित राज्य सरकारने सर्व यंत्रणांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्या अनुषंगाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सर्व नगर पंचायत, नगर पालिका व ग्रामपंचायतींना २०१६-१७ या वर्षात १०० टक्के कर वसुलीचे फर्मान सोडले होते. मात्र १०० टक्क्याच्या जवळ जिल्ह्यातील काही मोजक्या नगर पंचायत व नगर पालिका पोहोचल्या आहेत. ग्रामपंचायतीचीही अवस्था अशीच आहे. सन २०१६-१७ या वर्षात कोरची नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ७ लाख ५४ हजार ४१८ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. नगर पंचायत प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सर्वच ७ लाख ५४ हजार ४१८ रूपये मालमत्ता कर वसुली केली असून याची टक्केवारी १०० आहे. मालमत्ता करात दुसऱ्या स्थानी असलेल्या चामोर्शी नगर पंचायतीची वसुलीची टक्केवारी ९०.२४ आहे. चामोर्शी नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ६६ लाख २५ हजार ४८३ रूपयांची मागणी होती. यापैकी नगर पंचायतीने ३१ मार्चपर्यंत ५९ लाख ७९ हजार ३३२ रूपयांची मालमत्ता कर वसुली केली. याची टक्केवारी ९०.२४ आहे. पाणी कर वसुलीतही सन २०१६-१७ या वर्षात कोरची नगर पंचायत प्रथमस्थानी आहे. कोरची नगर पंचायतीची शहरवासीयांकडे जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण २ लाख ८ हजार ४३५ रूपयांची पाणी कराची मागणी होती. नगर पंचायतीने २ लाख ८ हजार ४३५ रूपये वसूल करून १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. पाणी कर वसुलीत कुरखेडा नगर पंचायत जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे. कुरखेडा नगर पंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ६ लाख ४२ हजार १२५ रूपयांची मागणी होती. यापैकी नगर पंचायतीने ३ लाख ९५ हजार ५९२ रूपयांची पाणी कर वसुली केली असून या कर वसुलीची टक्केवारी ६१.६१ आहे.गृहकरात गडचिरोली तर पाणीकरात देसाईगंज आघाडीवरगडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका आहेत. गडचिरोली पालिकेची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ३ कोटी ९६ लाख ८२ हजार ४२२ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. यापैकी गडचिरोली पालिकेने ३ कोटी १८ लाख ९० हजार ५०९ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी ८०.३६ आहे. देसाईगंज नगर पालिकेची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ४४ लाख ४७ हजार ५८९ रूपयांची मालमत्ता कराची मागणी होती. यापैकी देसाईगंज पालिकेने ३१ मार्चपर्यंत ७९ लाख ९८ हजार ३४२ रूपये मालमत्ता कर वसुली केली असून याची टक्केवारी ५५.३६ आहे. गडचिरोली पालिकेची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ९१ लाख ६४ हजार १३८ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ९८ लाख ५० हजार १९५ रूपये पाणी कर वसुली पालिकेने केली असून याची टक्केवारी ५१.३९ आहे. देसाईगंज पालिकेची एकूण ७२ लाख ३० हजार ५४६ पाणी कराची मागणी होती. यापैकी ५१ लाख ७८ हजार १६६ रूपये पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी ७१.६१ आहे. मालमत्ता कर वसुलीत गडचिरोली तर पाणी कर वसुलीत देसाईगंज नगरपालिका आघाडीवर आहे.