काेराेनाकाळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. जेथे चिंता तेथे झाेप येत नाही, असे म्हटले जाते. झाेपण्याचा प्रयत्न केला तरी झाेप येत नाही. काही व्यक्तींना माेबाइलचा छंद लागला आहे. थाेडाही वेळ मिळाला तरी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांचे अपडेट बघितले जातात. रात्री उशिरापर्यंत माेबाइल बघितला जातो. सकाळी कामावर जाण्यासाठी नियाेजित वेळेवर उठावेच लागते. अशावेळी झाेप पुरेशी हाेऊ शकत नाही. सातत्याने पुरेशी झाेप न झाल्याने त्याचे माेठे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.
बाॅक्स
झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम
- हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.
- राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.
- दिवसा फ्रेश वाटत नाही.
- वजन वाढण्याचा धाेका बळावतो.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
झाेप का उडते
- काेराेनाकाळात अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता भासत राहते.
- लाॅकडाऊनमुळे मित्र व नातेवाइकांना भेटणे अशक्य झाले. सतत घरीच राहिल्यामुळे सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.
- दैनंदिन जीवनक्रम बदलला आहे. सकाळी उठायची चिंता नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने झाेप कमी हाेते.
-घरच राहिल्यामुळे माेबाइल व टीव्ही पाहण्याचा अतिरेक झाला आहे.
-माेबाइल, टीव्ही, लॅपटाॅप, संगणक यांच्यामधून निळा लाइट निघतो. ताे डाेळ्यांवर पडल्याने मेंदूतून स्त्रवणाऱ्या मेलॅटाेटिनी या हार्माेन्सचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे झाेप येत नाही.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बेडरूमला ऑफिस बनवू नका
काेराेनामुळे काही जणांना घरूनच काम करावे लागत आहे. काही जणांनी बेडरूमला ऑफिस बनविले आहे. त्यामुळे बेडरूममधील शांतता धाेक्यात आली आहे. परिणामी स्वत:ची व इतरांचीही झाेपमाेड हाेत आहे. ’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे
झाेप येणे ही मेंदूशी संबंधित क्रिया आहे. मेंदू हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. झाेपेच्या गाेळ्या थेट मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे थाेडाही फरक पडला तरी त्याचे माेठे दुष्परिणाम हाेऊ शकतात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी घेऊ नये.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
नेमकी झाेप किती हवी
नवजात बाळ-१६ ते १८ तास
१ ते ५ वर्षे- १० ते १२ तास
६ ते १२ वर्षे - ९ ते ११ तास
१३ ते १८ वर्षे - ८ ते १० तास
१९ च्या पुढे ६ ते ८ तास
काेट
सदृढ आराेग्यासाठी पुरेशी झाेप येणे महत्त्वाचे आहे. मात्र, काेराेनामुळे गेलेला राेजगार, बुडालेला व्यवसाय यामुळे चिंता निर्माण झाली आहे. चिंतेमुळे झाेप लागत नाही. माेबाइल वापराचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे झाेप लागत नाही. नागरिकांनी बिघडलेली दिनचर्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांनी नियमित व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीर थकले की, झाेप येईल. माेबाइलचा अतिरेक टाळावा.
सातत्याने पुरेशी झाेप हाेत नसेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. प्रशांत कारेकर, फिजिशियन, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली