गडचिरोली : नागरिकांची हाेणारी प्रचंड गर्दी काेराेना संसर्ग झपाट्याने वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने बाेटावर माेजण्याइतक्या म्हणजे २५ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळ्यासह विविध कार्यक्रम पार पडत आहेत. काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांनी यावर्षीचे विवाह पुढे ढकलले आहेत. तर लग्न आटाेपलेल्या अनेक जाेडप्यांनी पाळणाही लांबविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लग्न साेहळा म्हटला की, वाजंत्री, गाड्यांचा ताफा, सजावट तसेच हजाराे वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणारी वरात आदी चित्र डाेळ्यासमाेर येते. परंतु मागील एक वर्षापासून काेराेना संकटामुळे विवाह साेहळ्यांसह धार्मिक आणि इतर सामाजिक आणि घरगुती कार्यक्रमांवर अटी व शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह कार्य पार पाडले जात आहे. असे असले तरी लग्न कार्यावर गाव समितीची नजर आहे.
बाॅक्स...
साध्या पद्धतीने विवाह
काेराेना संकटामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात रितसर परवानगी घेऊन अगदी साध्या पद्धतीने लग्न कार्य पार पाडले जात आहे. नागरिकांची गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पाेलीस व महसूल प्रशासनाकडून वधू व वरांच्या कुटुंबीयांना दिल्या जात आहेत.
बाॅक्स...
जिल्ह्यात जन्मदर घटला
गडचिराेली जिल्ह्यात सन २०१९ व २०२० या वर्षाच्या तुलनेत यंदा २०२१ मध्ये जिल्ह्यात जन्म दर घटला आहे. काेराेना संसर्गाच्या समस्येत अनेक अडचणी येत असल्याने गावातील लग्न संख्या घटली. परिणामी अनेकांनी पाळणा लांबविला.