१ पहिल्या अनलाॅकनंतर बाजारपेठेत गर्दी उसळली हाेती.
२ अनेकांनी बाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंद केला.
३ ग्रामीण व शहरी भागात कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.
४ काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतरही चाचणी करण्यास तयार नव्हते.
५ बाजारपेठेतून घरी गेल्यानंतर फारशी काळजी घेतली जात नव्हती.
बाॅक्स.....
नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची
१ काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येक नागरिकामध्ये जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार वागणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
२ दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी राहते. तरीही काही नागरिक अनावश्यक फिरत असल्याचे दिसून येते. काेराेनाचे संकट अजूनही गेले नाही, याची पक्की जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे.
३ काेराेनामुळे हाेणारे मृत्यू टाळण्यासाठी लस घेणे हा प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत जागृती केली जात आहे. लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
४ काेराेनाचे नियम पाळण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा पुन्हा दुकाने बंद करण्याची वेळ येईल.
५ शासकीय कार्यालयांमधील कर्मचारीही काेराेनाचे नियम पाळताना दिसत नाही. त्यांनीसुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे.
बाॅक्स ...
पहिला अनलाॅक दुसरा
४ ऑगस्ट २०२० दिनांक १ जून २०२१
६४४ एकूण काेराेना रुग्ण २९,३९६
१ एकूण मृत्यू ७१९