लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण गडचिराेली जिल्ह्यात वाढले असले तरी काेराेनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने काेराेना संसर्गाबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यात केवळ ४२९ पाॅझिटीव्ह रुग्ण शिल्लक राहिले असून त्यांच्यावर रुग्णालयात औषधाेपचार सुरू आहे.मंगळवारी जिल्ह्यात ५३ नवीन बाधित आढळून आले, तर दिवसभरात ८१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील आतापऱ्यंत बाधित ६ हजार ९७१ रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४६९ वर पोहचली आहे. तसेच सध्या ४२९ क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. तीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५६ वर्षीय एका पुरुषाचा, गडचिरोली येथील ७९ व ५० वर्षीय दोन उच्च रक्तदाब व मधुमेह ग्रस्तांचा समावेश आहे. मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८० टक्के, क्रियाशील रूग्णांचे प्रमाण ६.१५ टक्के तर मृत्यू दर १.०५ टक्के झाला. गेल्या १० ते १२ दिवसात काेराेना रूग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले आहेत. पण त्यामागे काेराेना चाचण्यांचे प्रमाण कमी हाेणे हे एक कारण असल्याचे बाेलले जाते.
अहेरीत वाढले काेराेना रूग्ण
नवीन ५३ बाधितांमध्ये गडचिरोली १९, अहेरी २०, आरमोरी २, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा ३, एटापल्ली ०, कोरची ०, कुरखेडा ०, मुलचेरा १, सिरोंचा १ व वडसा येथील ३ जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या ८१ रूग्णांमध्ये गडचिरोली ३७, अहेरी ८, आरमोरी ८, भामरागड ३, चामोर्शी ६, धानोरा १, एटापल्ली ८, मुलचेरा २, सिरोंचा ३, कोरची १, कुरखेडा ६ व वडसा मधील ० जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर १, वाकडी १, लाझेंडा २, शाहु नगर १, स्थानिक ३, गोकूल नगर १, आयटीआय स्केअर १, पेपर मिल कॉलनी १, सर्वोदय वाॅर्ड १, कन्नमवार वाॅर्ड १,कोटगल १, सोनापूर कॉम्पलेक्स १, बसस्टॉप एरिया १ अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली ११, नागेपल्ली १, स्थानिक ८, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये बर्डी १, खूटेबोडी १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अळयाळ १, दुर्गापूर २, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, जवळवाही १, बंधानो १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये ०, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये ०, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ०, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदर नगर १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये कोटपल्ली १ तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिदी कॉलनी १, हनुमान वाॅर्ड १, माता वाॅर्ड १ असा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील ० आणखी. तर इतर जिल्ह्यातील ३ जणाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील १ व गोदिया जिल्हातील २ बाधितांचा समावेश आहे