बाॅक्स ...
ढगाळ वातावरण
राेहिणी नक्षत्रापासून नवतपांना सुरुवात हाेते. यावर्षी राेहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरुवात हाेत आहे. नवतपा ३ जूनपर्यंत चालणार आहेत. या कालावधीत सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यानचे अंतर कमी हाेते. त्यामुळे सूर्याची प्रखरता वाढते. तापमानाचा पारा ४४ अंशांच्या जवळपास पाेहाेचते. नवतपांच्या पूर्वीही असह्य उकाडा राहतो. मात्र यावर्षी ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी काेसळत आहेत. त्यामुळे तापमानात घट हाेत आहे.
बाॅक्स ...
११ वाजेच्या आत घरात
काेराेनामुळे बाजारपेठ ११ वाजताच बंद केली जात आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक ११ वाजेच्या आत घरी राहतात. दिवसभर घरी राहल्याने उष्माघातापासून बचाव हाेत आहे. बांधकाम क्षेत्र मात्र सुरूच आहे. बांधकामावरील काही मजूर सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. तर काही मजूर सकाळी १०.३० वाजतापासून कामाला सुरुवात करून सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम करतात. या मजुरांना उष्माघाताचा धाेका आहे.
बाॅक्स ....
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ - ०८
२०२० - ०३
२०२१ - ०