तालुक्यातील कुभीटोला येथील रास्त भाव दुकान खरेदी विक्री सहकारी संस्थेच्यावतीने मागील १५ वर्षांपासून चालविण्यात येत आहे. त्यांच्याकडून नियमित व योग्य प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा सर्व कार्डधारकाना करण्यात येत आहे. याबाबत कोणत्याही गावकऱ्यांची तक्रार नाही. मध्यतंरीच्या काळात येथील दुकान एका बचत गटाला जोडण्यात आले होते. मात्र वारंवार अनियमिततेची तक्रार होत असल्याने परत हे दुकान खरेदी विक्री संस्थेकडे जोडण्यात आले होते. मात्र नुकतेच शासनाकडून दुकानाकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. हे दुकान कोणत्याही खाजगी किंवा संस्थेला न देता खरेदी विक्री सहकारी संस्थेकडेच कायम ठेवावे, अशी मागणी सरपंच किरण तलांडे, उपसरपंच लताबाई सहारे, ग्रा. प. सदस्य नवनाथ मडावी, सोनाबाई मडावी, कांशीराम पोरेटी, काशीनाथ जनबंधू , लताबाई कापगते, श्रीराम कोटनाके, भूवन मडावी, चिंतामण इस्कापे, यादव मूंगमोडे, वासूदेव इस्कापे, नामदेव कुमरे, रामदास मडावी, रघुनाथ नाकाडे यांच्यासह १४६ ग्रामस्थानी निवेदनाद्वारे केली आहे.
200921\3029img-20210917-wa0127.jpg
नायब तहसीलदार सूधाकर मडावी याना सरपंच किरन तलांडे उपसरपंच लताबाई सहारे