गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे १९८७ मध्ये पेपर मिल उद्योग सुरू करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन आता आपण स्वतः केलेला करारनामा कंपनी मोडीत काढत आहे. पेपर कटिंग व्यवस्थित सुरू असताना सुरू असलेली मशीन बल्लारपूरला घेऊन जाण्याचा कंपनीच्या व्यवस्थापनाचा मनसुबा आहे. त्यामुळे सदर मशीन बल्लारपूर येथे न नेता आष्टी येथेच ठेवावी. आष्टी येथील मशीन बाहेर नेल्यास येथील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती नियमाप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासनाकडे केली आहे.
बाॅक्स
कवडीमाेल भावात जमिनी लाटल्या
पेपरमिल कंपनीने आष्टी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी स्थायी नोकरी देण्याच्या करारनाम्यावर विकत घेतल्या. परंतु जमिनी दिलेल्या स्थानिकांना अस्थायी नोकरी दिली. आता मात्र अस्थायी कामगारांना वेठीस धरून हळूहळू मिल बंद करण्यात येत आहे. कवडीमाेल भावात खरेदी केलेल्या जमीन खरेदीतही आर्थिक पिळवणूक झाली. त्यानंतर आता कामगारांना बेराेजगार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आराेप कामगारांनी केला आहे.
220821\22gad_3_22082021_30.jpg
आ. डाॅ. देवराव हाेळी यांना निवेदन देताना पेपरमिल कामगार.