गडचिराेली : सुरक्षा व्यवस्था तसेच देशाची कायदा व सुरक्षा राखण्याचे काम गडचिराेली जिल्हा पाेलिसांसह सीआरपीएफ, एसआरपीएफ तसेच गृहरक्षक दलाचे जवान प्रामाणिकपणे करीत आहेत. दरम्यान, या विभागाला सुद्धा काेराेनाने साेडले नाही. असे असले तरी सुरक्षा जवानांनी आपली राेगप्रतिकारक शक्ती वाढविल्याने अनेकांनी काेराेनावर मात केली आहे.
काेराेना महामारीच्या संकटात काेविडच्या नियमांचे पालन पाेलीस विभागाचे कर्मचारी व जवान करीत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा काेविडचे नियम पाळण्यासाठी ते प्राेत्साहित करीत आहेत. यासाठी जनजागृतीसाेबतच दंडात्मक कारवाईसुद्धा केली जात आहे. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, यासाठी पाेलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान याेगासने, नियमित व्यायाम, धावणे तसेच पायी चालणे, आदी बाबींवर भर देत आहेत. राेगप्रतिकारक शक्ती वाढली की, काेराेना संसर्गाचा परिणाम हाेणार नाही, हे लक्षात आल्यावर जवान आपल्या आराेग्याच्या खबरदारीसह आहार व व्यायामाकडे विशेष लक्ष देत आहेत. तसेच कर्तव्यावर असताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.
बाॅक्स....
पहिली लाट
एकूण रुग्ण - ८,४९०
पाेलीस - ३५२
एकूण मृत्यू - ८५
पाेलीस - ००
...............
दुसरी लाट
एकूण रुग्ण - २०,०५२
पाेलीस - ८९३
एकूण मृत्यू - ५९८
पाेलीस मृत्यू - १४
बाॅक्स...
आतापर्यंत १२०० वर जवान बाधित
गडचिराेली जिल्ह्यात सीआरपीएफ, एसआरपीएफ, गृहरक्षक व जिल्हा पाेलीस मिळून पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मिळून एकूण आतापर्यंत १ हजार २४५ सुरक्षा जवान काेराेनाबाधित झाले आहेत. यापैकी जिल्हा पाेलीस ११ व सीआरपीएफ ३ अशा एकूण १४ जवानांचा मृत्यू झाला. याेग्य औषधाेपचार व सकारात्मक दृष्टिकाेन बाळगल्यामुळे तब्बल १ हजार २३१ सुरक्षा जवानांनी काेराेनावर मात केली आहे.
बाॅक्स....
व्यायाम व फळे खाण्यावर भर
काेराेना संसर्गाच्या कालावधीत आराेग्य चांगले राहावे, शिवाय संसर्ग हाेऊ नये, याकरिता सुरक्षा दलाचे जवान व अधिकारी नियमित व्यायामासाेबतच पाैष्टिक फळे खाण्यावर भर देत आहेत.
काेट....
नियमित व्यायामासाेबतच आपण याेगासने करीत आहाेत. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने दरराेज व्यायाम केला पाहिजे.
- पाेलीस जवान
.................
मी पाेलीस मित्रांसाेबत जिल्हा मुख्यालयाच्या ग्राउंडवर नियमित व्यायाम करण्यासाठी जात असताे. याशिवाय घरीसुद्धा वाफारा घेण्यापासून इतर प्रकारची काळजी सातत्याने घेत आहे.
- सीआरपीएफ जवान