लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. मात्र या खोदकामामुळे या ऐतिहासिक टेकडीला धोका निर्माण झाला आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्ट्राचे प्रभारी प्रफुल्ल भाबुलकर यांनी व्यक्त केले आहे.विदर्भातील ऐतिहासिक वास्तू, वने आणि वन्यप्राणी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी प्रफुल्ल भाबुलकर हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी वैरागड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, मंदिराची टेकडी व इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाने पाच वर्षांपूर्वी टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी टेकडीच्या खाली खोदकाम केल्याचे दिसून आले. तसेच टेकडीवर असलेली झुडूपे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया जत्रेच्या वेळी तोडली जातात. त्यामुळे टेकडी पूर्णपणे बोडखी झाली आहे. टेकडीवर झाडे नसल्यास टेकडीवर पडलेले पाणी आपल्यासोबत माती वाहून घेऊन जाईल. दरवर्षी असा प्रकार होऊन मोठ्या प्रमाणात टेकडीची धूप होईल. यामुळे एक दिवस टेकडीच नष्ट होण्याचा धोका वर्तविला. त्यामुळे टेकडीवर उगविलेली लहान लहान झाडे तोडू नये, असे मत सुध्दा भाबुलकर यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे.टेकडीवर खोदकाम केल्यास ऐतिहासिक वास्तूंना धोका होईल, याबाबत स्थानिक नागरिक तसेच लोकमतने अनेक वेळा पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मानण्यास तयार नव्हते. टेकडीवर खोदकाम केले. किमान यानंतर तरी खोदकाम केले जाऊ नये, तसेच झाडांची तोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विदर्भातील जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे. जमीन घट्ट व मजबूत राहून जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी जमिनीवर झाडे व सावली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड वाढली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊन जमीन ठिसूळ होत चालली आहे. जंगलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. जंगल वाचले तरच सजीवसृष्टी कायम राहिल. त्यामुळे झाडांचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.- अनिलकुमार, विदर्भ प्रभारी,वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया