खुर्शीद यांनी त्यांच्या शाळेत जे उपक्रम राबविले, ते देशपातळीवर प्रत्येक ठिकाणी राबवायला पाहिजे. यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे मत व्यापारी संघटनेच्या विविध सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी खुर्शीद शेख म्हणाले की, मृत शाळेला जीवनदान देऊन आनंदवन बनविले. शाळेला एका नवीन क्षितिजाकडे नेले. मुलांना मी रिपोर्टर म्हणून तयार केले. मुलांना जोलीवूड या व्हिडिओ संकल्पनेतून व्हिडिओग्राफी आणि ॲक्टिंगची संधी दिली. लघुपट, शैक्षणिक भाषा संवाद करणे, मुलांना खेळाबद्दल रुची आणणे आणि हरितक्रांतीचे धडे देणे, बाल व्यसनमुक्तीचे धडे देणे, समाजाला शाळाशी जोडले, ट्रायबल टू ग्लोबल, कोरोना साथरोगाशी लढणे, भाषिक उपक्रम राबविणे, आदी उपक्रम राबविले, असे सांगितले. संचालन मिलिंद खोंड, प्रास्ताविक व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच शंकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, माजी व्यापारी संघटना अध्यक्ष दिलीप बिरेल्लीवार, राकेश गण्यारापवर, वेंकटेश मद्यर्लावार, विजय गुप्ता, साईनाथ मिरालवार, ईरफान शेख, विवेक चेलियालवार, प्रकाश हलधर, रहीम शेख, आदी उपस्थित हाेते.
010921\53541637-img-20210901-wa0006.jpg
व्यापारी संघटना आलापल्ली कडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 चे मानकरी खुर्शीद शेख सरांचा सत्कार.