शेतात असलेल्या शेततळ्याजवळ ही दारू गाळली जात होती. एका कारवाईत एक लाख रुपये किमतीचा ५ नगर प्लास्टिक ड्रम भरून सडवा, ५० लिटर हातभट्टी दारू, ॲल्युमिनियम किटली, गंज, तसेच दुसऱ्या कारवाईत एक लाख रुपये किमतीचा १० ड्रम मधील सडवा, तसेच ५० लिटर दारू व इतर साहित्य असा मिळून अडीच लाखांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई वरिष्ठ वरिष्ठांच्या मार्गदर्शनात दादाजी करकाडे, निलकंठ पेंदाम, मंगेश राऊत, पुष्पा कन्नाके व शेषराज नैताम आदींनी केली.
(बॉक्स)
हातभट्टीसाठी गॅस सिलिंडरचा वापर
विशेष म्हणजे दारूच्या हातभट्ट्या लाकडे पेटवून चुलीवर लावल्या जातात. पण या प्रकरणात पोलिसांना दारूची भट्टी चक्क गॅस सिलिंडर, शेगडीवर लावलेली आढळली. पोलिसांनी दोन गॅस हंडे, शेगड्या, रेग्युलेटर जप्त केले.