आष्टी : साकाेली-वडसा-गडचिराेली-आष्टी-सिराेंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु या महामार्गावरील आष्टी येथील ग्रामीण रूग्णालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसरात डांबर उखडून खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरधाव ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरून सकाळी ६ वाजतापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या वेगाने आवागमन करतात. माेठे ट्रेलर व अन्य वाहनेसुद्धा या मार्गाने माेठ्या प्रमाणात आवागमन करतात. ही वाहने खड्ड्यातून गेल्यावर वाहनावरील ताेल जाऊन अपघात हाेऊ शकताे.
काही वाहनधारक हा खड्डा वाचविण्यासाठी वाहने विरूद्ध बाजूला घेऊन वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी विरूद्ध बाजूने येणाऱ्या वाहनावर वाहन आदळून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने शाळेचे विद्यार्थीसुद्धा सायकलने ये-जा करीत असतात. दुचाकी वाहनांची वर्दळ माेठ्या प्रमाणात असते. त्यामुळे येथे अपघात टाळण्यासाठी मार्गावरील अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चामाेर्शी तालुक्यातील बऱ्याच गावांना जाेडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे.