हरणघाट-चामोर्शी या १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर हरणघाट ते दोटकुली नाल्यापर्यंत व दोटकुली ते भेंडाळा वीज पाॅवर स्टेशनपर्यंत तर डांबर प्लांट ते दहेगावपर्यंत जागोजागी मोठं मोठे खड्डे पडले असून, दहेगाव अंगणवाडी समोर दोन मोठे खड्डे पडले त्या खड्ड्यातून वाट कशी काढावी या विंवचनेत वाहनधारक सापडले आहेत. चामोर्शी ते डांबर प्लांटपर्यंत वाहन कसे चालवावे ही मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे मात्र गेल्या वर्षापासून या रस्त्याच्या खड्ड्याची दखल घेण्यात आली नाही.
तालुक्यातील चामोर्शी-हरणघाट मूल क्र. ३७८ क हा राज्य मार्ग चंद्रपूर गडचिरोली राजनांदगाव महामार्ग क्रमांक ९३० आणि साकोली-गडचिरोली- सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ सी याला चामोर्शीला जोडतो. चामोर्शी ते मूल २७ किमी अंतर राज्य महामार्ग आहे. या राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केल्यास दोन्ही महामार्ग जोडल्या जाऊन परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
बॉक्स :
चामोर्शी-चाकलपेठ मार्गाला वाहनधारकांची पसंती
चामोर्शीकडून मूलकडे जाणारी वाहने मुरखळा क्रॉसिंगवरून चाकलपेठ गावातून जात आहेत. चाकलपेठ गावातील रस्त्याची जडवाहनामुळे वाताहत झाली आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहधारकांना ५ किमी अंतर वळसा घालून मुख्य मार्गावर यावे लागत असल्याने वाहधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दहेगावजवळ मुख्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने साधी मलमपट्टी केली नसल्याने रस्त्याचे दुखणे वाढत चालले आहे. याच मार्गावरून अहेरी आगाराच्या बसेस गडचिरोली येथे जात आहेत.
230921\img_20210819_145015.jpg
चामोर्शी हरणघाट रस्तावर संपूर्ण पाणी साचलेले आहेत.