लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गेल्या पाच-दहा वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली. शहराच्या गल्लीबाेळात व ग्रामीण भागात बहुतांश घरी दुचाकी आहे. वाहनांमुळे नागरिकांची पायी चालण्याची सवयी पूर्णत: बंद झाली आहे. त्यामुळे कमी वयातच गुडघा व कंबरदुखीचा त्रास अनेकांना जाणवत आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या आराेग्यावर हाेताना दिसत आहे. राेजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आराेग्याकडे अनेकदा दुर्लक्ष हाेते. आराेग्य निराेगी ठेवण्यासाठी दरराेज पायी चालण्यासाेबतच हलकासा व्यायाम करणे गरजेचे आहे. यातून गुडघा, कंबर व मणक्याच्या त्रासापासून दूर राहता येते.
बाॅक्स...
या कारणासाठीच हाेतेय चालणे
ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ आणि सायंकाळी चालतात.
महिला - किराणा व भाजीपाला दुकानापर्यंत.
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयापर्यंत आणि केली शतपावली.
तरुणाई - गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत.
कामगार - कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत.
.....................
चालण्याचे फायदे
- सकाळी चालल्यामुळे शरीराला सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा हाेताे.
- हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्व सकाळच्या काेवळ्या उन्हातून मिळते.
- चालल्यामुळे कामातून आलेला थकवा दूर हाेताे. शारीरिक व मानसिक व्यायाम हाेतो.
- चिडचिडेपणा दूर हाेऊन झाेप चांगली लागते.
.............................
म्हणून वाढले हाडाचे आजार
या शरीरात कॅल्शियम व व्हिटाॅमिन ‘डी’ची कमतरता, शारीरिक हालचाली व व्यायामाचा अभाव, अयाेग्य आहार, धूम्रपान तसेच मद्यपानामुळे हाडे ठिसूळ हाेतात. यातून हाडांचे दुखणे व हाडांचे आजार बळावतात. सध्याच्या युगात बैठे काम माेठ्या प्रमाणात वाढले आहे. संगणक, लॅपटाॅप व माेबाइलवर बैठे काम करण्यामुळे कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास हाेताे.
काेट...
माणसाचे वजन वाढले की, त्याच्या सांध्यावर प्रभाव पडतो. पायावर व गुडघ्यावर सूज येते, स्थूलता वाढते. गुडघा, कंबरदुखी, तसेच हाड व मणक्याच्या आजाराच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी नियमित व्यायाम करावा. चालण्याचा व्यायाम शक्य नसल्यास त्यांनी घरगुती व्यायाम करावा. वजन नियंत्रित ठेवावे. पाेषणयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. अधिक त्रास जाणवल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधाेपचार करावा.
- डाॅ. राेहन कुमरे, अस्थिराेगतज्ज्ञ,
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली
.....................
हे करून पाहा
- एक किमी परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.
- कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.
- घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.