कै. महेश सावकार पाेरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चातगाव : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक टी. के.बाेरकर व प्रियंका वड्डे या विद्यार्थिनीने सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन केले. दरम्यान भाषण, निबंध, वक्त्तृत्व व परिसंवाद स्पर्धा घेण्यात आली. संचालन के. आर. खापरे तर आभार बी. आर. मुळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जी. पी. तळवलकर, व्ही. जी. मामीडपल्लीवार, प्रा. एच.बी. चौधरी, एन. डी. नवघडे, आर. के. मोहुर्ले, बी. आर. मुळे, व्ही. एस. परशुरामकर, एम. एन. निंबार्ते, शिपाई आर. पी. नंदेश्वर, सी. के. गोटा यांनी सहकार्य केले.
श्रीनिवास हायस्कूल, अंकिसा : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम. टी. वाढई, पी. डी. मांडवे, व्ही. एम. दडमल, एम. ए. मेश्राम, जी. पी. ढाेरे, आर. एन. भाेपये उपस्थित हाेते.
संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा विद्यालय नवेगाव : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक जे. के. भैसारे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. के. चुटे, बी. आय. अंबादे, व्ही. ए. ठारे, आर. डी. यामावार, टी. डी. मेश्राम, व्ही. एन. दडमल, आर. एस. शृंगारपवार, पी. व्ही. रामगिरवार, एस. टी. भुरसे, आर. डी. माेहुर्ले, डिमदेव श्रीरामे, गंगाधर चंदावार उपस्थित हाेते. मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याविषयीची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संचालन पी. एस. येडलावार तर आभार टी. डी. मेश्राम यांनी मानले.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा काेंढाळा : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका निरुपारा देशपांडे, संताेष टेंभुर्णे, सुरेश आदे, रेखा चाैधरी, माधुरी रामगुंडे, रजनी जांभुळकर उपस्थित हाेत्या. संचालन अंकिता शेंडे तर आभार सुमित वाढई यांनी मानले. दरम्यान भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामाेर्शी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा याेजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. राजेंद्र झाडे, प्रा. डाॅ. भूषण आंबेकर, प्रा. डाॅ. रमेश बावणे, प्रा. संजय म्हस्के, रवींद्र कऱ्हाडे, चंद्रकांत राठाेड, तुळशीराम जनबंधू उपस्थित हाेते.
डाॅ. आंबेडकर विद्यालय आरमाेरी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. जी. शेंडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून एस. के. वासनिक, आर. एम. नैताम, कमला मेश्राम, दीपा सालाेटकर, एन. डी. गेडाम उपस्थित हाेते. या निमित्ताने भाषण स्पर्धा घेऊन पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. परीक्षण हंसराज बडाेले, डी. एम. श्रीखंडे, टी. एस. फुलबांधे यांनी केले. संचालन सी. एम. दुरबुडे तर आभार आशिष साेमनकर यांनी मानले.
नवाेदय हायस्कूल घाेट : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी. के. कांबळे हाेते. यावेळी शिक्षक सुनील गाेवर्धन, किशाेर ढाेरे, शांताराम कुनघाडकर, रवींद्र भांडेकर व विद्यार्थी उपस्थित हाेते.
लालशहा मडावी विद्यालय कारवाफा : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी यादव बावणे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून आर. के. साखरे, व्ही. एच. बारसिंगे, पुनित डाेंगरवार, फिराेज कुरेशी उपस्थित हाेते. मुख्याध्यापक एम. एम. बावणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले. मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली. संचालन डी. सी. वाळके यांनी केले.