काेरची : ६० गावांची देवी म्हणून ओळख असलेल्या कुंभकाेट येथील राजमाता देवीची जत्रा २० जानेवारी राेजी भरली. या जत्रेत हजाराे भाविकांची गर्दी उसळली हाेती. विशेष म्हणजे, कुंभकाेटच्या देवीला तालुक्यात प्रथम पूजनाचे स्थान आहे. कुंभकाेटच्या जत्रेनंतरच तालुक्यात इतर ठिकाणी जत्रांना सुरुवात हाेते. कुंभकाेट येथील देवी आदिवासी व इतर समाजाची आराध्य दैवत मानली जाते. येथील जत्रेला चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, छत्तीसगड राज्यातील भाविक येतात. राजमाता देवीच्या पूजनानंतर जत्रेला सुरुवात हाेते. नगरपंचायत काेरचीचे नगरसेवक श्यामलाल मडावी यांच्या हस्ते दीप्रपज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनाेज अग्रवाल, महादेव बन्साेड, पं. स. सदस्य सदाराम नराेटे, आनंद चाैबे, आशिष अग्रवाल, राहुल अंबादे, निळा कन्नाके, नंदू पंजवानी आदी उपस्थित हाेते. दुपारी ४ वाजता मंडईची प्रभातफेरी काढण्यात आली. आकाश पाळणे, मिठाईची दुकाने, कापड, खेळणी, भाजीपाला, साैंदर्य प्रसाधनांची दुकाने जत्रेत लागली हाेती.
बाॅक्स .......
मंदिर जीर्णाेद्धाराच्या प्रतीक्षेत
६० गावांची देवता म्हणून ओळख असलेल्या कुंभकाेट येथील राजमातेचे मंदिर जीर्ण झाले आहे. हेमाडपंती शील्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याची गरज आहे. यासाठी लाेकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.