लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे. राजकीय व्यवस्थेने ओबीसी व कुणबी समाजाची पूर्णत: वाट लावली आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीही प्रचंड अडचणीत सापडला आहे. आता शेतकरी व कुणबी समाजाला वाचवून त्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी कुणबी समाजाने सदैव जागृत राहून कायम एकसंघ राहावे, असा सूर माजी खासदार नाना पटोले, आमदार बाळू धानोरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढला.कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर कुणबी महामेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या मेळाव्यााला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नाना पटोले, आमदार सुनिल केदार, आमदार बाळू धानोरकर तर वक्ते म्हणून प्रसिध्द साहित्यीक तथा कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रा. दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डाफ, प्रफुल गुळधे पाटील, नरेंद्र जिचकार उपस्थित होते.कुणबी समाज उन्नत व प्रगत नाही. त्यामुळे या समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धीच शिष्यवृत्ती मिळते, वसतिगृहाची सोय नाही. त्यामुळे शिक्षण घेताना ओबीसी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब दारिद्र्याच्या खाईत जात आहेत, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २० हजारांवर कुणबी समाज बांधवांनी हजेरी लावली होती. महिला व युवतींचीही या महामेळाव्यात लक्षणिय उपस्थिती होती. याप्रसंगी आ.सुनिल केदार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राह्मणवाडे, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार धनपाल मिसार यांनी मानले.मान्यवरांचा सूर : कुणबी महामेळाव्याला २० हजारपेक्षा अधिक समाजबांधवांची उपस्थितीमतपेटीतून एकता दिसू द्या - ज्ञानेश वाकुडकरसरकारला गायीच्या मूत्राची किंमत आहे. मात्र शेतकरी आत्महत्येचे काहीही देणेघेणे नाही. जात कुणबी, धर्म कुणबी, पक्ष कुणबी, संघटना कुणबी या तत्वाने मार्गक्रमण करून शेतकरी विरोधी राजकीय नेत्यांना धडा शिकवा, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कुणबी समाज बांधवाने या मेळाव्यासारखीच मतपेटीतून एकता दाखवून यापुढे महाराष्टÑाचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा बनवा असे आवाहन साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी यावेळी केले.हक्क नाकारणाºयांना धडा शिकवा - चौधरीमाणसाला अर्थात शेतकऱ्याला मारून भारत महासत्ता कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करून चांगले व वाईट काय हे समजून घेऊन त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करा. निवडून दिलेले पुढारी आपले ऐकत नसतील तर त्यांना निवडणुकीत पाडता आले पाहिजे. सध्या भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्ये लागली आहे. कुणबी, ओबीसी समाज व शेतकऱ्यांचे हक्क नाकारणाºया नेत्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.अन्याय खपवून घेणार नाही - वैष्णवी डाफशेतकऱ्यांच्या समस्येवर छत्रपती शिवाजी महाराज कटाक्षाने लक्ष देत होते. शिवाजी महाराजांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. मात्र आता शेतकरी, कुणबी व ओबीसी समाजावर सर्वच क्षेत्रात शासनाकडून अन्याय होत आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांला त्यांनी पिकवलेलया धानाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. हा अन्याय कुणबी समाज बांधव आता खपवून घेणार नाही, असा इशारा वैष्णवी डाफ यांनी दिला.स्मार्ट व्हिलेज कधी होणार - मेघा रामगुंडे५२ टक्के लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे, आम्हाला भिक नको तर आमचे अधिकार व हक्क द्या, अशी मागणी करीत विद्यमान सरकार स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन करण्यावर भर देत आहे. मात्र देशात व महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकारचे खेडेगावाकडे दुर्लक्ष आहे. स्मार्ट व्हिलेज कधी होणार, ग्रामीण भागातील शेतकरी केव्हा प्रगत होणार असा सवाल मेघा रामगुंडे यांनी केला.
कुणबी समाजाने एकसंघ राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:55 PM