शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दारू विक्रेत्यांविरोधात कुरखेडा पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 5:00 AM

तालुक्यातील चिखली येथील निखिल राऊत व मंदाबाई राऊत यांच्या घरून देशी दारूच्या १०० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत पाच हजार रूपये होते. याच गावातील सूर्यकांत मडावी याच्या घरी धाड टाकून ६० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत तीन हजार रूपये एवढी होते. आंधळी येथील हरिदास नागोसे याच्या घरावर धाड टाकून १०० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली.

ठळक मुद्देसहा ठिकाणी धाड : आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी पाच विविध ठिकाणी तर मंगळवारी एका ठिकाणी धाड टाकून दारू आठ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून देशी व मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला.तालुक्यातील चिखली येथील निखिल राऊत व मंदाबाई राऊत यांच्या घरून देशी दारूच्या १०० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत पाच हजार रूपये होते. याच गावातील सूर्यकांत मडावी याच्या घरी धाड टाकून ६० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत तीन हजार रूपये एवढी होते. आंधळी येथील हरिदास नागोसे याच्या घरावर धाड टाकून १०० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. कुरखेडा येथील आंबेडकर चौकातील माधुरी जुमनाके हिच्या घरातून पाच लिटर दारू जप्त केली. आरमोरी तालुक्यातील चव्हेला येथील रंजीत हिचामी हा उराडी ते कढोली मार्गावरून दुचाकीने दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्या दुचाकीवर ५० लिटर मोहफुलाची दारू आढळली.मंगळवारी कुंभीटोला, सतीनदी घाटाजवळ दुचाकी वाहनाने वाहतूक केली जाणारी १५ लिटर मोहफूल दारू जप्त केली. ओमप्रकाश लाकडे व नागेश तुलावी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत सहा ठिकाणी कारवाई करीत आठ आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पारधी, हवालदार, बाबुराव उराडे, गौरीशंकर भैसारे, केवळराम धांडे, रूपेश काळबांधे, प्रेमलाल चौरीकर, राधेश्याम चिखलोंडे, प्रफुल बेहरे, गौरी कुमरे यांच्या चमूने केली.कोरेगावजवळ दारू जप्तमहागाव नदीघाटातून कोरेगाव मार्गाने दुचाकीने वाहतूक होणारी सुमारे ६० हजार रूपये किमीची देशी दारू जप्त केली आहे. या मार्गाने दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती बोडधा येथील चेक पोस्टवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई संतोष नागरे व होमगार्ड विशाल तुपटे यांना प्राप्त झाली. त्यांनी नदीघाटावर पाळत ठेवली असता, एम. एच. ३३, आर ४४७८ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने पोत्यामध्ये भरून दारूची वाहतूक केली जात होती. ६० हजार रूपये किमीची दारू व ४० हजार रूपये किमतीचे वाहन, असा एकूण एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी योगेश माकडे (२६) रा. उदापूर ता. ब्रम्हपुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अशोक कराडे, पोलीस नाईक विजय नंदेश्वर करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी