लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज-कुरखेडा रस्त्यावर देसाईगंज शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुकूम वॉर्ड परिसरात वैनंगगा मोटर्स ते जकात नाका समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्डे दिसत नाही. परिणामी येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या अपघाताला आमंत्रण देत आहे.देसाईगंज येथे भाजीपाला बाजार, कपडा बाजार, धान्यगंज बाजार, शिक्षणाच्या सुविधा तसेच कुरखेडा, कोरची परिसरात कार्यरत कर्मचारी देसाईगंज येथे राहत असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन देसाईगंजवरून कुरखेड्याला व कुरखेड्यावरून देसाईगंजला ये-जा करणाऱ्या एस.टी., खाजगी वाहने, स्कूल बस यांची वर्दळ असते. तसेच या परिसरात भात गिरण्या असल्याने वाहतुकीसाठी ट्रकचा वापर होतो.वाहनधारकांची दिशाभूलरस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना हे खड्डे पाण्याने भरले असतात. वाहनचालकाला खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. खड्डे वेळीच मुरुम किंवा डांबराने भरली नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी केली जात आहे.
कुरखेडा मार्ग खड्ड्यांनी जर्जर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:59 PM
देसाईगंज-कुरखेडा रस्त्यावर देसाईगंज शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुकूम वॉर्ड परिसरात वैनंगगा मोटर्स ते जकात नाका समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्डे दिसत नाही.
ठळक मुद्देअपघाताला आमंत्रण : अवजड वाहनांमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर