कुरूड येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताे. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन पाण्याची टँकर खरेदी करण्यात आली. टँकरचे लाेकार्पण सरपंच प्रशाला अविनाश गेडाम यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायतीमध्ये अभिवादन करण्यात आले. गावातील पाण्याची टंचाई, तसेच खासगी व सार्वजनिक कामांसाठी पाण्याच्या टँकरचा उपयाेग हाेणार आहे. पूर्वी लग्नसमारंभ असो, की सामाजिक कार्यक्रम, बैलबंडीने पाणी आणावे लागत होते. मात्र, टँकरमुळे लग्नकार्य, सामाजिक कार्यक्रम यासाठी याचा फायदा होणार आहे. पाणी टँकरच्या लाेकार्पणप्रसंगी उपसरपंच क्षितिज उके, ग्रामविस्तार अधिकारी संजय चलाख, अविनाश गेडाम, विलास पिलारे, शंकर पारधी, पलटूदास मडावी, प्रवीण उईके, रेखाताई मडावी, पूजा डांगे, आशा मिसार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
कुरूड ग्रामपंचायतीला मिळाले पाण्याचे टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:37 AM