गडचिराेली : कामगार, कर्मचारी नेते र. ग. कर्णिक यांना राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर चतुर्थश्रेणी कर्मचारी, समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना निळ-ठुबे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक सुनील चडगुलवार, सरचिटणीस तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भास्कर मेश्राम, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के, तहसीलदार गजेन्द्र बालपांडे, नायब तहसीलदार गौरीशंकर चव्हाण, एस. के. बावणे, किशोर भांडारकर, खरेदी अधिकारी गजानन कोकड्डे, राजू रेचनकार, गजानन ठाकरे, संजीव बोरकर, श्रीकृष्ण मंगर, नरेंद्र आंबोणे, गुरुदेव नाकाडे, जितेंद्र टेकाम, फिरोज लांजेवार, दत्तात्रय नरड, अशोक कायरकर, छाया मानकर, आशिष सोरते, संतोष बोंदरे, दयाराम मेश्राम उपस्थित होते. यावेळी दाेन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
धानाेरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, नायब तहसीलदार डी. आर. भगत, धनराज वाकुडकर, माधुरी हनुमंते उपस्थित हाेते. याप्रसंगी दाेन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वनिश्याम येरमे यांनी केले.