शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मजुरांची उपासमार; रोहयो बनतेय 'उधार' योजना, मजुरी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:14 IST

Gadchiroli : सिंचन विहिरींच्या अनुदानासाठी प्रतीक्षाच; गावात कामे मिळूनही मजुरांची परजिल्ह्यात मिरची तोडणीच्या कामासाठी धाव

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २४ हजार मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकली आहे. 

सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत म्हणजे १० जानेवारी २०२५ पर्यंत केलेल्या कामाचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा न झाल्याने शासनाची ही योजना उधारीवरील योजना बनत चालली आहे. ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व हातांना काम देण्याबरोबरच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत, गांडूळखत, वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर अशा १४ प्रकारच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. मात्र गेल्या दीड वर्षांपासून या कामांचे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही.

६० : ४० चे प्रमाण नाही राहेयो कायद्यान्वये कुशल कामे ४० टक्के, तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून कामांमध्ये ६०:४० प्रमाण ठेवले जात नसल्याचे दिसून येते.

१९ कोटी रस्ता, नाली कामाची बिले निघतात लवकर ३७ लाख रुपयांची रोहयो कामाची मजुरी गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याने मजूर संकटात सापडले आहेत. 

तालुका                  मजूर संख्या               मजुरीची रक्कमअहेरी                         ३९२७                         ७२७५७०८ आरमोरी                     ११६०५                        १७३७६७९३ भामरागड                    २९९८                         ५१२८२६५ चामोर्शी                      १४८३२                        २४२२३०४० देसाईगंज                    १८३५२                        २२३९९३१६धानोरा                        १९२७३                        ३०७२४५३५एटापल्ली                    ३७१९                         ६८१८६०३गडचिराली                  १६३६८                        २४८१५३०४कोरची                        ९९५२                         १५९५४६९८कुरखेडा                     १६१५५                         २५०११९५०मुलचेरा                       ४७०६                         ८१७९२२८सिरोंचा                        २९००                          ५७४४४६६एकुण                        १२४७८७                       १९३७२१९०६

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली