जारावंडी परिसरात राष्ट्रीयकृत बॅंक नसल्याने नागरिकांना ५५ किमी अंतर गाठून एटापल्लीला जावे लागते. एटापल्ली येथील बॅंकेत प्रचंड गर्दी राहत असून इंटरनेटची गतिमान सुविधा नाही. अनेकदा लिंक फेलमुळे नागरिकांचे काम खाेळंबत आहे.
बाॅक्स...
इंटरनेट सुविधा देण्याची मागणी
जारावंडी परिसरात इंटरनेट ची सुविधा नाही. त्यामुळे परिसरातील लोक ऑनलाईन व्यवहार व इतर गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहेत. याचा परिणाम विकासावर होत आहे. सद्य:स्थितीत शासकीय, खासगी कार्यालयीन कामे ऑनलाईन झाली आहेत. परंतु इंटरनेटची सुविधा नसल्याने लाेकांना सरळ छत्तीसगड राज्यात किंवा गडचिराेली जिल्ह्यात जावे लागते. जारावंडी येथे पाेलीस ठाणे, डाक विभाग, प्राथमिक आश्रमशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्र, वनविभाग व आविका संस्थेचे केेंद्र आहेत. या सर्व कार्यालयाचे कामकाज ऑनलाईन केले जाते. त्यामुळे इंटरनेटसेवा उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रश्नाकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स....
जिल्हाधिकारी साहेब, लक्ष द्या
जारावंडी परिसर आदिवासी आणि नक्सलग्रस्त असून परिसरात अनेक सोयीसुविधेचा अभाव आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा परिसराच्या विकासाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळे परिसरात अनेक समस्या उद्भवत आहेत. बँक व इंटरनेट सुविधेचा अभाव, ही माेठी समस्या आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या समस्येकडे लक्ष देऊन जारावंडी भागाच्या विकासासााठी बॅंक व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.