शिक्षण, सेवा आणि निवडणूक यासाठी जात तपासणीची गरज असणाऱ्या प्रकरणांचा यात समावेश आहे. अनेक प्रकरणे दाखल झाल्यानंतर आठवडाभरात निकाली काढली जात आहेत. पण, तपासणीसाठी येणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण जास्त आहे.
(बॉक्स)
समितीत ३० टक्के पदे रिक्त
या कार्यालयात एकूण ३५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २५ भरलेली असून १० रिक्त आहेत. त्यात पोलीस निरीक्षकांची ४ पैकी ३ रिक्त आहेत. संशोधन अधिकारी ३ पैकी २ रिक्त आहेत. संशोधन सहायक १, लघुलेखक निम्नश्रेणी ही ३ पैकी ३ पदे रिक्त आहेत. तसेच लिपिक टंकलेखकाचेही एक पद रिक्त आहे. डीवायएसपींचे एक पद दोन दिवसांपूर्वी भरण्यात आले. महत्त्वाची पदेच रिक्त असल्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहात आहेत.
(बॉक्स)
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विशेष मोहीम
सध्या विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांचे अर्ज लवकर निकाली निघावे यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीसही तातडीने कागदपत्रे खरी असल्याची खात्री करतात. त्यामुळे ही प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढली जात असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पूर्ण कागदपत्रांनिशी अर्ज केल्यास प्रकरण दोन दिवसांतही निकाली काढले जाते. पण, ज्या प्रकरणात शंकेला वाव आहे ती प्रकरणे पोलीस दक्षता पथकाकडे दिली जातात. याशिवाय काही प्रकरणे अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रलंबित राहतात. ते लोक वाढीव तारीख मागतात. यातून प्रकरणे प्रलंबित राहतात.
- अशोक वाहणे
प्रभारी उपसंचालक तथा सदस्य सचिव
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती