लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ४८ हजार ९७२ हेक्टर एवढे आहे. जमिनीचा उतार तीन टक्के एवढा आहे. जमिनीच्या पोतानुसार पिकांना खताची मात्रा देता यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाची निवड करताना मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने जमिनीची चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये जमिनीत नेमके कोणते गुणधर्म आहेत, हे तपासले जाते. २०१७-१८ या वर्षात सुमारे १९ हजार ९७३ मृद नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी तयार करण्यात आली आहे. नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्माचा सुपिकता निर्देशांक अनुक्रमे १.२, १.३३ व २.४० एवढा आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्र व स्फुरद गुणधर्माची सुपिकता पातळी कमी असल्याने या दोन्ही खतांची मात्रा २५ टक्के अधिक द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर असल्याने पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी देण्याचा सल्ला दिला आहे.८४ टक्के जमीन आम्लधर्मीगडचिरोली जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमीन सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आहे. जमिनीची क्षारता सर्वसाधारण असून सर्व पिकांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. सुक्ष्म मूलद्रव्यांमध्ये जस्त व लोहाची कमतरता आढळून आली आहे. त्याकरिता झिंक सल्फेट २५ ते ३० किलो प्रती हेक्टरी देण्यास सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आढळून आला आहे.कोरडवाहू क्षेत्राचा विकासगडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकरी पीक घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे सदर जमीन पडिक राहते. या जमिनीचा विकास करण्यासाठी शासनाने राष्टÑीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षात ८८.८४ लाख रूपयांचे लक्षांक प्राप्त झाले. त्यापैकी ७२ लाख ३९ हजार रूपये अनुदानावर खर्च झाले आहेत. २२९ लाभार्थ्यांच्या शेतीचा विकास करण्यात आला आहे.शेतकºयांना मार्गदर्शनाची गरजजमिनीच्या पोतानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यायची असतानाही बहुतांश शेतकरी सरसकट मिश्रखतांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी आहे. ही बाब केवळ कागदोपत्री आहे. मात्र शेतकºयांना याची माहिती नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा नेमक्या कोणत्या प्रमाणात खत द्यायचे, याबाबत मार्गदर्शन करीत नाही. परिणामी शेतकरी आपल्या पारंपारीक रितीने खत मात्रा देतात.
नत्र व स्फुरदची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM
गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.
ठळक मुद्देमृद चाचणीचे निष्कर्ष : जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक