लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधाºयाला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वैरागड येथील वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात पाणी जिरावा, या उद्देशाने शिवकालीन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या बंधाºयाचा मूळ उद्देश सफल झाला नाही. कारण नदीपात्रात समांतर बंधारा बांधला गेला असला तरी नदी काठाच्या दोन्ही बाजू खुल्या आहेत. नदीपात्रात खोलवर मुरलेले पाणी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने विशेषत: खालच्या बाजूने प्रवाहित होत असते. त्यामुळे या बंधाºयाचा उन्हाळ्यात नळ योजनेच्या विहिरीला उपयोग होत नाही. तसेच आजवर झालाही नाही.बंधाऱ्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने नदीपात्रात मुरलेले पाणी बाजूने निघून जाते. शिवाय पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने देखील दरवर्षी नदीचाकाठ खचत आहे. परिणामी बंधाऱ्यालगत शेती असलेल्या शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता बळावला आहे. त्यामुळे वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. एकूणच शिवकालीन बंधाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कढोलीच्या बंधाऱ्याची पुनरावृत्ती होऊ नयेकुरखेडा तालुक्याच्या कढोली येथे सती नदीपात्रात नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर असलेल्या खालील भागात चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. येथेही संरक्षण भिंतीअभावी नदी किनाऱ्याची फार मोठी हानी झाली. अशीच पुनरावृत्ती वैरागड येथील शिवकालीन बंधाºयांची होऊ नये, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बंधाऱ्यात संरक्षण भिंतीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:11 AM
येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे नदी काठाची हानी होत आहे.
ठळक मुद्देनदीकाठाची होतेय हानी : सात वर्षांपूर्वी बांधला शिवकालीन बंधारा