लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांचे प्रमाणे अधिक असून या नदी, नाल्यावर पूल उभारण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लाहेरीपासून चार किमी अंतरावर असलेल्या होडरी येथील एका महिला रुग्णाला खाटेवर झोपवून नाल्यातून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून औषधोपचारासाठी भरती करण्यात आले.होडरी येथील रहिवाशी महिला तुल्ली मंगरू तिम्मा हिला पोटदुखी व उल्टीचा त्रास होऊ लागला. तसेच तापही चढल्याने तिच्यावर तत्काळ औषधोपचार करणे गरजेचे होते. मात्र गावात आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र लाहेरी व होडरी या दोन गावाच्या मधात मोठा नाला आहे. या नाल्याला अद्यापही पाणी आहे. नाल्यातून तुली तिम्मा या महिलेला नेण्यासाठी गावातील १० ते १५ लोकांनी पुढे येऊन सदर महिलेला खाटेवर झोपवून खांद्यावर लाहेरीला नेले. विशेष म्हणजे नाल्याच्या पाच फूट पाण्यातून त्यांनी मार्ग काढला. लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तुल्ली तिम्मा हिला भरती करण्यात आले. सदर महिलेवर औषधोपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
वाहतुकीच्या सोयीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:55 PM
नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांचे प्रमाणे अधिक असून या नदी, नाल्यावर पूल उभारण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
ठळक मुद्देप्रकृती धोक्याबाहेर : रुग्ण महिलेला खाटेवरून आणले आरोग्य केंद्रात