तुळशी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गाव विकास युवक मंडळाच्या वतीने तुळशी येथे काेविड याेद्धे व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माेठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यवान खोब्रागडे होते. यावेळी सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, उमाकांत कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य गुणाजी वझाडे, सचिन रामटेके, रेखा तोंडफोडे, अस्मिता मिसार, सुमन रामटेके, सुनीता वाघाडे, सुरेखा दुनेदार, पोलीसपाटील तेजस्विनी दुनेदार, प्रा. राजेंद्र वालदे, पी. एम. उपरीकर, रुपाली धाकडे, नाशीर जुम्मन शेख, डाॅ. प्रेमलाल मेश्राम, शारदा राऊत, माजी उपसरपंच मुरलीधर दुनेदार, वसंतराव मिरगे, एकनाथ वघारे, श्रीराम लोणारे, सत्यवान रामटेके, जनार्दन गोंडाणे, मधुकर सुकारे, वाय. बी. मेश्राम, कान्हाजी दुनेदार, विस्तारी ठाकरे, लंकेश्वर पत्रे, मानिक दोनाडकर आदी उपस्थित होते.
यावेळी कोविड योध्दे म्हणून आरोग्यसेवक ललीत बडोले, अंगणवाडी सेविका पुष्पा दुनेदार, वैशाली गोंडाणे, शोभा रामटेके, मदतनीस नम्रता गोंडाणे, अनुसया दुनेदार, प्रमिला राऊत, आरोग्य मदतनीस विश्रांती लोणारे, पोलीसपाटील तेजस्विनी दुनेदार, आशावर्कर शीला लोणारे, हिरकन्या रामटेके, ग्रामपंचायत कर्मचारी कौशिक सुकारे, विनोद रामटेके, भेदराज लोणारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशा लोणारे व विष्णू दुनेदार यांनी केले. उमाकांत घोरमोडे यांनी प्रास्तविक केले. सदाशिव वझाडे यांनी आभार मानले.
बाॅक्स....
विजेत्या स्पर्धकांचा सत्कार
इयत्ता दहावीमध्ये जितेंद्र सोमेश्वर सुकारे, मनीष गुरुदेव वझाडे, प्राची विनायक बागडे व इयत्ता बारावीतून नरेश रामकृष्ण पत्रे, ओमकार खुशाल वझाडे, भाग्यश्री गुरुनाथ पत्रे यांनी गावातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना चषक देऊन सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत ‘अ’ गटातून साक्षी हरिश्चंद्र दुनेदार, साहील एकनाथ मारबते, मयुरी धनराज वझाडे, तर ‘ब’ गटातून कावेरी सुभाष दुनेदार, वैष्णवी नरेंद्र दुनेदार, गौरव विष्णू सुकारे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.