अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मनात जिद्द आणि इच्छाशक्ती तीव्र असल्यास मनुष्य हवे ते साध्य करू शकतो. मग त्यासाठी विविध कारणे किंवा नशिबाला दोष देत बसत नाही. विसोरा येथील गाढवी नदीच्या पात्रात शरीरिक क्षमता वाढवण्यासाठी सराव करणाºया युवकांकडे पाहून याचा प्रत्यय येतो. खेळाचे मैदान नाही, कोणती व्यायामशाळा नाही, पण तरीही आपल्या भविष्याचे लक्ष्य निश्चित करून नदीपात्रातील रेतीत व्यायाम करणारे अनेक युवक इतर युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.अनेक गावात खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतींचा सराव करण्यासाठी मैदान नाही, परंतु पोलीस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात जागी झाल्याने काही युवक स्वस्थ बसू शकत नव्हते. अखेर हार न मानता गावाजवळून वाहणाºया गाढवी नदीतील रेतीच्या सपाट जागेला मैदान समजून त्यांनी सराव सुरू केला. सध्या नदी पात्रात पाणी वाढल्याने डांबरी रस्त्यावर विसोराचे तरूण मुले सराव करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला सुयोग्य मार्गदर्शन आणि कायमस्वरूपी मैदानाची नितांत गरज आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि गावकऱ्यांनी त्यांना सकारात्मक साथ द्यावी अशी मागणी होत आहे.विसोरा येथील काही विद्यार्थी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर आवडीने आणि आपली शारीरिक क्षमता पारखून पोलीस, सैन्यदल, सीआरपीएफ, एसआरपीएफ, सीआयएसएफ अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या विविध विभागात देशसेवा करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी दैनंदिन शारीरिक सराव ज्यात धावणे, उंच उडी, गोळा फेक यांचा समावेश असतो. पण याकरिता विसोरा येथे सार्वजनिक मैदान नाही. विसोरावरून कुरखेडाकडे जाताना एक-दीड किमीवर असलेल्या गाढवी नदीच्या डाव्या बाजूकडील पात्रात पाणी प्रवाह कमी असताना काही भाग खुला असतो. या शंभर-दोनशे मीटर लांब आणि ५० मीटर रूंद रेतीच्या नैसर्गिक मैदानावर विसोराचे २० ते २५ युवक दररोज सकाळी आणि सायंकाळी धावतात. तसेच विसोरा ते वडसा रोडवर धावण्याचा सराव करतात. जमिनीवर धावताना पायांना त्रास होत नाही, पण डांबरी रस्ता दगडासारखा टणक असल्यामुळे धावतान खूप त्रास होत असल्याचे युवक सांगतात.जोराचा पाऊस आल्यावर गाढवी नदीमधील पाण्याचे प्रमाण वाढून पात्र भरून वाहते. इतर वेळी मात्र लहानशी पाणी धार वाहात असते. परिणामी नदीचे पात्र मोकळे असते. पाऊस बंद झाला की गाढवी नदीतील पाणी लवकर कमी होते आणि पात्र खुले होते. मग पुन्हा तिथे धावणे सुरू होते. गावात जागा न मिळाल्याने नदीच्या काठावर असलेल्या आमराईमध्ये या युवकांनी उंच उडीसाठी ग्राउंड बनविले आहे. ग्रामपंचायतने मैदान बनवून दिल्यास आणखी जास्त मुले, मुली शारीरिक सराव करू शकतील, असे प्रशांत अवसरे या युवकाने सांगितले.योग्य मार्गदर्शन आणि सुविधांचा अभावविसोरा हे १२०२ कुटुंबांचे गाव आहे. गावाला सांस्कृतिक, सामाजिक परंपरेचा उत्तम साज असून पंचक्र ोशीत नावलौकिक पण आहे. विसोरा येथे डॉक्टर्स, वकील, शिक्षक आहेत. परंतु लोकसंख्येत देसाईगंज तालुक्यातील तिसºया क्र मांकाच्या या गावातील फक्त दोन पुरु ष पोलीस कर्मचारी म्हणून सेवेत आहेत. एक सीआरपीएफ मध्ये आहे तर याच वर्षी एक जवान सैन्यदलातून निवृत्त झाले. विसोरा येथे सार्वजनिक मैदान नसल्यामुळे अनेक उत्तम शरीरयष्टी आणि क्षमता लाभलेले युवक देशसेवा करण्याच्या संधीला मुकले आहेत. त्यांना गावपातळीवर प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्यास येथील युवक देशसेवेच्या कामात आघाडीवर राहतील हे निश्चित.
मैदानाअभावी ते नदीपात्रात करतात शारीरिक सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:00 AM
अनेक गावात खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतींचा सराव करण्यासाठी मैदान नाही, परंतु पोलीस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात जागी झाल्याने काही युवक स्वस्थ बसू शकत नव्हते. अखेर हार न मानता गावाजवळून वाहणाºया गाढवी नदीतील रेतीच्या सपाट जागेला मैदान समजून त्यांनी सराव सुरू केला. सध्या नदी पात्रात पाणी वाढल्याने डांबरी रस्त्यावर विसोराचे तरूण मुले सराव करीत आहेत.
ठळक मुद्देविसोऱ्यातील युवकांची जिद्द : गाढवी नदीच्या रेतीवर धावताहेत भावी पोलीस व सैन्यदलातील जवान