अंकिसा येथे लक्ष्मीदेवारा बोनालू (जत्रा) : अंकिसा येथे आदिवासी समाजाच्या (नाईकपोड) कुलदैवतेची लक्ष्मीदेवारा जत्रा १ ते ३ जानेवारी या कालावधीत साजरी करण्यात आली. पहिल्या दिवशी देवीचे गंगास्रान, मूर्ती स्थापना आणि देवारा आठापाठा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीदेवारा बोनालू तिसऱ्या दिवशी तिर्गुवारम करण्यात आले. यावेळी जत्रेत सर्व प्रकारची दुकान लावण्यात आले होती. या कार्यक्रमाला मुरली लस्मय्या गोसुला, मलय्या रामय्या पेद्दी, मलय्या कालापेल्ली, सुधाकर मेचिनेनी, चंदनकुमार पेद्दी, सुदर्शन किष्टय्या पेद्दी, चंद्रय्या गोसुला, दशावतारालू कोडी, व्येंकटी रामुलू कस्तुरी, चंद्रम नंदम वंगपेल्ली, व्येंकटेश्वर कालापेल्ली, पुन्नम कुर्री आदी उपस्थित होते.
अंकिसा येथे लक्ष्मीदेवारा बोनालू (जत्रा) :
By admin | Published: January 05, 2017 1:33 AM