यावेळी खा. नेते यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध कामांसाठी केलेल्या तरतुदींची माहिती दिली. त्यात गडचिरोली जिल्ह्याचाही वाटा राहणार आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलेल्या मदतीचे आकडेही त्यांनी दिले.
पत्रपरिषदेला नगराध्यक्ष योगिता पिपरे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती मुक्तेश्वर काटवे, प्रशांत वाघरे, जि.प.चे कृषी सभापती रमेश भारसाकडे, भाजपचे पदाधिकारी गोविंद सारडा, डॉ. भरत खटी, सुधाकर येनगंधलवार, अनिल करपे आदी उपस्थित होते.
(बॉक्स)
व्यापाऱ्यांनी उपस्थित केला शहरातील रस्त्यांचा प्रश्न
- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर व्यापारी वर्गाची काय भावना आहे जाणून घेण्यासाठी त्यांची बैठकही खा. नेते यांनी घेतली. त्यात सर्वसामान्यांच्या उपयोगाच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करावा, व्यापारी वर्गाला आर्थिक पंगू बनवून बेरोजगारी वाढविणाऱ्या ऑनलाइन विक्री पद्धतीवर मर्यादा घालाव्यात, अशा अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. याशिवाय सध्या ऐरणीवर असलेला शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
- भूमिगत गटार लाइनसाठी शहरातील सर्व मार्ग खोदण्यात आले; पण त्यांची दुरुस्ती केली नसल्यामुळे प्रचंड धूळ उडून दुकानदार आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गटार लाइनचे चेंबर दीड ते दोन फूट उंच केल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर खा. नेते यांनी आपण प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून या विषयावर नगर परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.