शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

दोन दिवसांपासून आलापल्ली ग्राम पंचायत कुलूपबंद

By admin | Published: October 16, 2015 1:54 AM

स्थानिक ग्राम पंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक व्ही. टी. वेलादी यांच्याकडे ९ आॅक्टोबर रोजी सोपविण्यात आला आहे.

आलापल्ली : स्थानिक ग्राम पंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक व्ही. टी. वेलादी यांच्याकडे ९ आॅक्टोबर रोजी सोपविण्यात आला आहे. मात्र यापूर्वीचे ग्रामसेवक दासरवार हे ग्राम पंचायतीच्या कार्यालयाची चावी घेऊन पसार झाले असल्याने मागील दोन दिवसांपासून ग्राम पंचायत कार्यालय कुलूपबंद असून कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत. दासरवार व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असल्याने दासरवार यांची बदली करावी, अशी मागणी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. दासरवार हे नेहमी गैरहजर राहत असल्याने ग्रा. पं. सदस्य संतप्त होते. ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वेलादी यांच्याकडे प्रभार सोपविला. मात्र दासरवार यांनी वेलादी यांच्याकडे प्रभार न सोपविताच ग्रामसेवक कक्षाला कुलूप ठोकून निघून गेले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प पडला आहे. दासरवार यांच्याकडून चावी मागून कार्यालयीन कामकाज सुरळीत करावा, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)