शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

दोन वर्षात ३७० किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:04 AM

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत. यासोबतच पुढील दोन वर्षाकरिता ३७० किलोमीटरच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासनाकडे प्रस्ताव सादर : जुनी कामे वर्षभरात संपविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत. यासोबतच पुढील दोन वर्षाकरिता ३७० किलोमीटरच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या कामांचा प्रस्ताव आमदारांच्या सहमतीने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ती कामेही सुरू होणार आहेत.ग्रामीण भागातील रस्त्याचे जाळे सुरळीत करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. मात्र या जिल्ह्यात अधिकाºयांची कमतरता आणि कंत्राटदारांच्या समस्यांमुळे गेल्या दोन वर्षात कामे चांगलीच रखडली. ही कामे आमदारांनी निवडलेली असल्याने आमदारांनाही नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. मात्र आता ही कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेने कंबर कसली आहे.या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली २०१५-१६ मधील २० रस्त्यांची कामे मे २०१८ पर्यंत तर २०१६-१७ मधील ५१ प्रलंबित कामे डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतर योजनांच्या निधीप्रमाणे या कामांचा निधी शासनाकडे परत जात नाही. तो नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांकडे सुरक्षित असतो. त्यांच्याच कडून या कामाची बिले काढली जातात.दरवर्षी आमदारांकडून गावांची निवड करून त्याचे अंदाजपत्रक तयार करणे, शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे आणि नंतर पुढील प्रक्रिया करणे यात बराच वेळ जातो. यामुळे पुढील दोन वर्षांचे नियोजन आधीच करणे सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता दिलीप देवळे यांनी सांगितले. त्यात २०१७-१८ साठी १८५ किलोमीटर तर २०१८-१९ साठी १८५ किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी अंदाजपत्रक बनविले जात आहे. त्यातील यावर्षीच्या टप्पा १ मधील ९० किलोमीटरचे अंदाजपत्रक बनविले असून ते लवकरच मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे.