लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला. जिल्ह्यातील गोदामांमध्ये तांदूळ उपलब्ध नसल्यामुळे नागपूर येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून ३५० मेट्रिक टन तांदळाची उचल करण्यात आली. हा तांदूळ आता शाळास्तरावर पुरवठा करणे सुरू झाले आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. पण यावर्षी राज्य स्तरावर शालेय पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राटच दिल्या गेले नाही. मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर पोषण आहारासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करून नंतर बिल सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी केल्या असल्या तरी त्यासाठी मुख्याध्यापक तयार नाहीत. विशेष म्हणजे तांदळाचा पुरवठा जिल्हास्तरावरच शासकीय गोदामांमधून करण्याचे निर्देश आहेत. परंतू वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये तांदूळच उपलब्ध नसल्याचे सांगत गेल्या दोन महिन्यांत बहुतांश शाळांमध्ये तांदळाचा पुरवठा झाला नाही.‘लोकमत’ने ४ नोव्हेंबरच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित करून तांदूळ पुरवठ्यात गडबड होत असल्याचे निदर्शनास आणताच प्रशासकीय यंत्रणा सावध झाली. लगेच नागपूर येथील भारतीय खाद्य निगममधून ३५० मे.टन तांदळाची उचल करून जिल्ह्यातील शाळांना तो तांदूळ पुरवठा करण्याचे निर्देश वाहतूकदाराला देण्यात आले. त्यानुसार दोन दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करणे सुरू झाले आहे.या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तांदळाचा पुरवठा होईल असे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले. तांदूळ मिळाले तरी इतर साहित्याचा पुरवठा अजूनही अधांतरीच आहे.‘लोकमत’च्या बातम्यांवरूनशिक्षण संचालकांना पत्रराज्यस्तरावर पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट दिवाळीपर्यंत होईल असे आधी सांगण्यात आले होते. तोपर्यंत मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर किराणा साहित्याची जुळवाजुळव करून पोषण आहार पुरवावा असे सांगण्यात आले. मात्र त्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी आधीच असमर्थता दर्शविली. आता दिवळी आटोपली तरी पोषण आहाराचा पत्ता नसल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लोकमतने बातम्या लावताच त्या बातम्यांच्या कात्रणासह जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना पत्र लिहून पोषण आहारावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.तांदळाची टंचाई कशी?गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित तांदळाचा पुरवठा ४ ते ५ जिल्ह्यांना करण्यात आला. मात्र काही महिन्यात गडचिरोलीतच तांदळाचा तुटवडा कसा निर्माण झाला? जर या जिल्ह्याला पुरेल एवढ्या तांदळाचे उत्पादन झाले नव्हते तर येथील तांदूळ इतर जिल्ह्यांना पुरवठा करण्याची गरज होती का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संदर्भात वखार महामंडळाच्या अधिकाºयांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल सतत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान तांदळाचा साठा आणि शेतकºयांकडून खरेदी केलेल्या धानाचा साठा करण्यासाठी जिल्ह्यात अजूनही शासकीय गोदामांची कमतरता असून प्रशासकीय यंत्रणा गोदाम बांधकामाबाबत कमालीची उदासीन दिसत आहे.
अखेर पोषण आहारासाठी शाळांना तांदळाचा पुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:12 AM
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला.
ठळक मुद्देजिल्ह्यात तांदूळ टंचाई : नागपूरवरून ३५० मेट्रिक टनची उचल