या अभियानातील पाचव्या दिवसात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ७६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले. अभाविप गडचिरोलीच्या वतीने चारभट्टी, पलसगड व रेखामेंढा या गावांमध्ये जाऊन लसीकरणाबद्दल माहिती सांगून लसीकरण केंद्रावर डॉक्टर व परिचारिका यांना मदत करण्यात आली, ज्यात स्थानिक लोकांनी चांगला प्रतिसाद देत लस घेतली.
यावेळी अभाविपचे चंद्रपूर - गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, भाग संयोजक चेतन कोलते, उत्तम गावतुरे, प्राची बडोदे, प्रतीक्षा भेंडारे, चेतन मोहुर्ले, आशिष उईके, कारण कोसरे, कुरखेडा नगर अध्यक्ष प्रा. देवेंद्र शिवणकर, टिना बनसोड, सुमित ठाकरे, हर्षल दररो, भीमराव लाडे, जिल्हा संघटन मंत्री शक्ती केराम, आदी उपस्थित होते.