शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

चामोर्शीत विकास कामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:57 PM

चामोर्शी येथे कृउबास व तालुका विक्री संघाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

ठळक मुद्देकृउबास व खरेदी विक्री संघाचा पुढाकार : संरक्षक भिंत, धरमकाटा, गोदाम, शेतकरी माल साठवणूक केंद्र उपलब्ध

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : चामोर्शी येथे कृउबास व तालुका विक्री संघाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास तथा मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष माधुरी पालीवाल, पूर्व विदर्भ सचिव संजय कन्नावार, विदर्भ अध्यक्ष मनोज साबळे, पूर्व विदर्भ सहकार आघाडीचे राजू झरकर, व्यापारी संघ अध्यक्ष गौतम गुंदेजा, दुग्ध विकास भंडाराच्या संचालिका निमा हलमारे, रासप प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गजानन चौगुले, अ‍ॅड. अभिजीत ऋषी, कृउबासचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, बंडूजी ऐलावार, निबंधक डी. टी. सरपाते, मुरलीधर बुरे, उद्योजक जयसुखलाल दोषी आदी उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत २ कोटी ३८ लाख रूपयांच्या स्व:निधीतून शेतकºयांसाठी थंड पाण्याची मशीन बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर संरक्षण भिंत, धर्मकाटा, गोदामाचे नूतनीकरण, शेतकरी माल साठवणूक केंद्र यांचे लोकार्पण करण्यात आले. ५५ लाखांच्या ओपन शेडचे भूमीपूजन केले. यामुळे शेतकºयांना सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या तीन कोटीच्या निधीतून स्व. भैय्याजी पाटील दीक्षित शॉपींग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात आले. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.कार्यक्रमाला संचालक अरूण बंडावार, गोसाई, सातपुते, सुधाकर निखाडे, जानकीराम कुसनाके, शंकर वंगावार, विनायक आभारे, गणपती भंडारे, रामचंद्र ब्राह्मणकर, निलेश गद्देवार, बाजीराव गावडे, सतीश रॉय, चंद्रकांत दोषी, शामराव लटारे, अनिल नैताम, कौशल्याबाई पोरटे, बयनाबाई मडावी, राजू खापरे, निरज राजकोंडावार, गोपाल पिपरे, अरूण बंडावार, शामराव पोरटे, नामदेव सोनटक्के, अरूण लाकडे, साईनाथ पेशट्टीवार, मंजुषा चलकलवार, सरोज कोंडूकवार, व्यवस्थापक बबनराव श्रीकुंटवार, राजू आत्राम, संजय श्रुंगारपवार, दीपक तातावार, प्रशांत कोडगीरवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी केले. संचालन निलेश गद्देवार तर आभार प्रा. मनोज नागोसे यांनी केले. यावेळी नामदार महादेव जाणकर व अतुल गण्यारपवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते.