लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील कोचीनारा येथे १६ जानेवारीपासून युवा क्रिकेट मंडळाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारविरोधी समितीचे तालुकाध्यक्ष आशिष अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील कराडे, कांताराम जमकातन, शहर कार्याध्यक्ष चेतन कराडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल अंबादे, डॉ. मंडल, शिक्षक पुल्लूरवार, जितेंद्र सहारे, तालुका सरचिटणीस अभिजीत निंबेकर, आनंद पंधरे, चंदू वालदे, समशेरखाँ पठाण, शुभम परिहार, मुकेश पारधी उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कराडे, उपाध्यक्ष जयेंद्र बघवा, सचिव नितेश कराडे, सहसचिव सचिन जोगे, क्रीडाप्रमुख उमेश गावडे, कोषाध्यक्ष ओमकार सुवा, कर्णधार हेमलाल सहाळा, उपकोषाध्यक्ष सुशांत नंदेश्वर, उपकर्णधार टेकराम भक्ता मेहनत घेत आहेत.