लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र स्मशानभूमीच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला नसल्याने अंत्यविधी नदीतच पार पाडावे लागत आहेत.गडचिरोली शहरातील बहूतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेह जाळण्यास अडचण होत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास फंडातून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण केले नाही. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदला आहे. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. स्माशनभूमीत वीज जोडणीचे कामही झाले आहे. इमारतीच्यावर पाणी टाकी बसवून त्यामध्ये पाणी टाकले जाणार आहे. मात्र अजूनपर्यंत पाणीटाकी बसविण्यात आली नाही. उर्वरित काम करण्यास आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी आहे स्मशानभूमीस्मशानभूमीत दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील पहिली इमारत अंत्यविधीसाठी आलेल्यांना थांबण्यासाठी आहे. तर दुसऱ्या इमारतीत मृतदेह जाळण्याठी तीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत.विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीत टाईल्स लावण्यात आल्या आहेत. या टाईल्स लोकार्पणापूर्वीच निघाल्या आहेत. त्यामुळे त्या चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या टाईल्स पून्हा बसविणे आवश्यक आहे.
वर्षभरापासून रखडले स्मशानभूमीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:58 AM
स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे.
ठळक मुद्देइमारत पूर्ण : बोअरवेल खोदण्यासाठी लागले एक वर्ष