उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दामोदर भगत, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चाैधरी, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ साळवे, सारंग साळवे, संजय कुंडू व शेतकरी उपस्थित होते.
मे महिन्यातच मक्याची मळणी झाली. तेव्हापासूनच शेतकरी आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत हाेते. परंतु शासनस्तरावरून दिरंगाई झाली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले व मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. धानाेरा तालुक्यातील मुरुमगाव व कारवाफा येथेही मका खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे; परंतु तेथे गाेदामाची व्यवस्था नसल्याने धानोरा येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मका विक्रीस आणताना चालू हंगामाचा पीक पेरा असलेला सात-बारा उतारा मूळ प्रत, आधार कार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत व मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे, असे केंद्राच्या वतीने कळविण्यात आले.