एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या बुर्गी येथील पाेलीस मदत केंद्रात पाेलीस दलातर्फे पाेलीस दादालाेरा खिडकीचा शुभारंभ करण्यात आला. उपविभागीय पाेलीस अधिकारी संकेत गाेसावी यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रमाचे उद्घाटन झाले.
पाेलीस दादालाेरा खिडकीचे उद्घाटन कृषी अधिकारी पेंदाम यांच्या हस्ते झाले. यावेळी १९२ बटालियनचे सहायक कमांडंट अतुल सिंग, प्रभारी अधिकारी आलुरे, ग्रामसेवक व पाेलीस जवान उपस्थित हाेते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली. या खिडकीच्या माध्यमातून पहिल्या दिवशी तीन दिव्यांग व्यक्तींना बस सवलत कार्ड, १६ पॅनकार्ड तसेच २५ आयुष्यमान भारतकार्ड काढून देण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सदर कार्डचे वितरण करण्यात आले.
खिडकीच्या माध्यमातून विविध शासकीय याेजनांचे अर्ज माेफत भरून दिले जाणार आहेत. तसेच ऑनलाइन सातबारा, आधारकार्ड, जाॅबकार्ड यासह अन्य प्रमाणपत्र काढून दिले जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची तालुका मुख्यालयात जाऊन हाेणारी पायपीट व त्रास थांबणार आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएसआय आलुरे यांनी केले.