ऑनलाईन लोकमत सिरोंचा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. ना. आत्राम यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला.मोेयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडल्यानंतर बोरमपल्ली येथे सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, गतवर्षी शासनाकडून १८० कोटी रूपयांचा निधी आणण्यात आपल्याला यश मिळाले. पुढील वर्षी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या २० किमीच्या रस्त्यासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. आसरअल्ली-कोपेला या १२ किमीच्या रस्ता कामासाठी १२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामांचा समावेश असून रस्ता निर्मितीमुळे दुर्गम भागातील गावे बारमाही रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. परिणामी वाहनांची वाहतूक वाढणार आहे.सभेला प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचाचे नगरसेवक संदीप राचेर्लावार, नाविसंचे उपाध्यक्ष संतोष पडालवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, श्रीनाथ राऊत, दिलीप सनीगारापू, रवी चकीनारापू, संतोष पटला, पाणीपुरवठा सभापती विजय तोकला, पं. स. सदस्य जयमना दुर्गम, स्वामी मासर्ला, बाबर शेख, रामन्ना कडार्ला, सुरेश पद्मगिरीवार, जयेंद्र श्रीपती, नीलेश गग्गुरी, अशोक पेद्दी, राजेशम कासेट्टी, मलान्ना संगर्ती, राजबापू पोलमपल्ली आादी उपस्थित होते.तथाकथित राजकारणाला बळी पडू नका-आत्रामकाही लोक गैरसमज पसरवित असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी तथाकथित राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही जी कामे झाली नाहीत, ती कामे आपण सिरोंचा तालुक्यात पूर्ण करणार, असे ते म्हणाले.
३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:17 AM
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी शब्द पाळला : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अहेरी उपविभागात १०० कोटींची कामे