धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न, मोठे समारंभ असले की त्या मोहल्ल्यातील नागरिक कोणताही मोबदला न घेता जंगलात जाऊन पळस, कुडा, मोह झाडांची पाने तोडून आणून सायंकाळी चौकात १० ते २० नागरिक एकत्र बसून गंमतीजमतीत पत्रावळी तयार करून घेत असत त्यामुळे ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे अशांना मोठा दिलासा मिळत असे मात्र दिवसेंदिवस हा सेवाभाव समाजातून कमी होत चालला आहे. पत्रावळी व द्रोण तयार करणारे कुटुंब लग्न समारंभ काळात या कामातून चार पैसे कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते मात्र या कुटुंबावर आता उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. एक प्रकारचा घरगुती लघुउद्योग असायचा. घरातील सर्व मंडळी पानाच्या पत्रावळी तयार करण्यास मदत करीत होते. मात्र आता सर्रास प्लास्टिक, स्टील, थर्माकोल ताटांनी त्याची जागा घेतली आहे. त्यामुळे पानाच्या पत्रावळी दिसेनाशा झाल्या आहेत.
(बॉक्स)
प्लास्टिकबंदी ठरतेय कुचकामी
सन २०१८ पासून शासनाने यावर बंदी घातल्यावरही पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पानांच्या पत्रावळींना चांगले दिवस येतील असे वाटू लागले होते, मात्र शासनाच्या कागदोपत्री बंदीचा यावर कोणताही परिणाम झाला नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा व ज्याचे आयुर्वेद साक्ष देते त्या पानाच्या पत्रावळी तयार करण्यासाठी लिंबाच्या किंवा बांबूच्या काड्याचा शिळक म्हणून वापर केला जात असे. अजूनही ग्रामीण भागात घरगुती कार्यक्रमात पानांच्या पत्रावळीत देवाला नैवेद्य मांडला जातो. पानांच्या पत्रावळीमुळे भोजनावळीची रांग शोभून दिसत होती.
===Photopath===
160521\28371651img-20210516-wa0160.jpg
===Caption===
पानाच पत्रावळी व द्रोण