लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व विभागाच्या कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नवीन अंशदायी निवृत्ती योजनेचा महाराष्टÑ राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा कुरखेडाच्या पदाधिकाºयांनी त्याग केला असून याबाबतचे त्यागपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे व तालुकाध्यक्ष गणेश आखाडे यांच्या नेतृत्वात विभाग प्रमुखांना दिले.अंशदायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत कर्मचाºयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या योजनेंतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जात आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत स्वत:चा वाटा जमा केला नाही. त्यामुळे अंशदायी रकमेचा मेळ जुडत नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये २० पेक्षा जास्त कर्मचाºयांचा मृत्यू झाला. त्यांचे निवृत्ती वेतन व त्या विषयीच्या लाभाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. मात्र शासनाने सदर प्रस्ताव परत पाठविले आहे. कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या कुटुंबाला लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारची योजना कोणत्याच कामाची नाही. शनिवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे व तालुकाध्यक्ष गणेश आखाडे यांच्या नेतृत्वातील सर्व कर्मचाºयांनी नवीन योजनेचा त्याग करीत वैयक्तिक त्याग पत्र कार्यालय प्रमुखांना सादर केले. यावेळी नेपाल वालदे, प्रविण मेश्राम, सुधीर गद्देवार, तुळशीराम नरोटे, पत्तीराम औरासे, देवा घोडमारे, चांदेकर, वडेट्टीवार, रवींद्र गावंडे, दीपक ढबाले, अल्का कुमरे, बगडे, विकास नाकाडे, संजय राऊत, सदाशिव कुमरे, सुधाकर नेवारे, मुलचंद शिवणकर, मुंडे, गट्टूकर, देवा हलामी, सिडाम उपस्थित होते.
अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा त्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:13 PM
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व विभागाच्या कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नवीन अंशदायी निवृत्ती योजनेचा....
ठळक मुद्देयोजना अन्यायकारक : जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांचा निर्धार