गडचिराेली : रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले. ही घटना गडचिराेली तालुक्यातील बाेदली गावाजवळ कक्ष क्रमांक १७६ मध्ये बुधवार ३० ऑगस्ट राेजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. दुशान जगन्नाथ देऊरमले (२७) रा. चेक हत्तीबाेडी ता. पाेंभुर्णा जि. चंद्रपूर असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.बाेदली येथील अशाेक नैताम यांच्या घरी दुशान देऊरमले हा आपल्या बहिणीकडे रक्षाबंधन सणानिमित्त ओवाळणीसाठी आला हाेता. रक्षाबंधनाची ओवाळणी आटाेपून ताे बुधवारी सकाळी स्वगावाकडे दुचाकीने अन्य एका सहकाऱ्यासाेबत निघाला. दरम्यान धानाेरा-गडचिराेली मार्गावर बाेदलीपासून १ किमी अंतरावरील झुडपांलगत ताे सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास शाैचास बसला. याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. तेव्हा साेबतचा व्यक्ती व अन्य काही लाेकांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. खांदा व पाेटावर जखमबिबट्याने हल्ला केल्याने दुशान देऊरमले यांच्या खांद्यावर बिबट्याच्या दाताची तर पाेटावर पंज्याच्या नखांची जखम आहे. दुशान यांना वेळीच रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर क्षेत्रसहायक श्रीकांत नवघरे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली व वेळीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री पुन्हा दर्शन देऊरमले यांच्यावर हल्ला करणारा बिबट बुधवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास काही वाहनधारकांना रस्त्यावरच ठाण मांडलेल्या स्थितीत दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर आहे. बिबट्यापासून लाेकांच्या जीविताला धाेका आहे. त्यामुळे नागरिकांनी बाेदली परिसरातील जंगलात जाऊ नये, असे आवाहन क्षेत्रसहायक क्षेत्रसहायक श्रीकांत नवघरे यांनी केले.
ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना
By गेापाल लाजुरकर | Published: August 31, 2023 7:28 PM