शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

शिवारात बिबट जखमी अवस्थेत आढळला

By admin | Published: November 12, 2014 10:43 PM

तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

कोरची : तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची वार्ता कळताच नवरगाव परिसरातील नागरिकांनी जखमी बिबट्याला पाहण्यासाठी शिवाराकडे धाव घेतले.जखमी अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे, वनरक्षक झाडे, भोयर, पवार, क्षेत्रसहाय्यक शेंडे आदी घटनास्थळावर पोहोचले. यावेळी जखमी बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक साधन सामुग्रीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभर प्रतीक्षा करावी लागली. वृत्त लिहिस्तोवर बिबट्याला पकडण्याचे साहित्य घटनास्थळी पोहोचले नव्हते. नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात असलेल्या जखमी बिबट्याला तातडीने पकडून औषधोपचार करणे आवश्यक आहे. मात्र वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे सायंकाळपर्यंत जखमी बिबट्याला पकडण्यात आले नव्हते. जखमी बिबट्याला पकडून औषधोपचार करण्यास विलंब झाल्यास जखमी बिबट्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वनविभागाशी संबंधीत अशीच घटना चामोर्शी शहरानजीक घडली. चामोर्शी शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावरील वैनगंगा नदीघाटालगत असलेल्या आमराई परिसरात १२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वाघीण मृतावस्थेत आढळून आली. चामोर्शी लगतच सदर घटना घडल्याने वाघिणीला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. बुधवारी सकाळी काही शेतकरी आमराई परिसरात आपल्या शेतीवर गेले असता, आमराई परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सदर हकीकत नागरिकांना सांगितली व लगेचच सदर घटनेची माहिती चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांना फोनवरून देण्यात आली. मृत वाघिणीचा पोटाखालील भाग पाण्याने भिजलेला असल्याचा घटनास्थळी आढळून आला. त्यामुळे वाघिण वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्यातून आली असावी, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.