लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी २३ हजार ७८६ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १७ हजार ७१७ शेतकºयांनी विमा काढला आहे.अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यासह मानव व निसर्ग निर्मित आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकºयाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यावेळी सदर शेतकºयावर फार मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत संबंधित शेतकºयाला थोडीफार आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकºयांनी विमा काढावा, यासाठी कृषी विभागातील अधिकाºयांनी जनजागृती केली. मात्र याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पीक विमाधारक शेतकºयांची संख्या ६ हजार ६४ ने घटली आहे. चालू वर्षी १७ हजार ७१७ शेतकºयांनी २२ हजार ४५६ हेक्टरचा विमा काढला आहे. १ कोटी ६१ लाख ८२ हजार ६८८ रूपयांचा विमा प्रिमीयम सादर केला आहे.शेतीचे नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळत नाही. हा दरवर्षीचा शेतकºयांचा अनुभव असल्याने बहुतांश शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्ज काढतात, त्यांच्या कर्जाच्या रक्कमेतूनच विम्याची रक्कम कपात केली जाते. ते शेतकरी विमाधारक बनतात. मात्र स्वत:हून शेतकरी पीक विमा काढण्यास तयार होत नाही. परिणामी प्रशासनाच्या जनजागृतीनंतरही पीक विमा काढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. धानाव्यतिरिक्त कापूस, सोयाबिन यासारख्या पिकांचा विमा काढण्याचे प्रमाण धानाच्या तुलनेत कमी आहे.जिल्हा बँकेकडे शेतकºयांचा ओढाचालू खरीप हंगामासाठी विमा काढलेल्या एकूण १७ हजार ७१७ शेतकºयांपैकी १२ हजार ३८९ शेतकºयांनी जिल्हा सहकारी बँकेतून विमा काढला आहे. आयसीआयसीआय बँक व एक्सीस बँकेतून एकाही शेतकºयाने विमा काढला नाही. विजया बँकेची केवळ दोन शेतकºयांनी विमा काढला असल्याचे दिसून येत आहे.कर्जमाफीचा कर्ज भरण्यासह विमा काढण्यावर परिणामकर्जमाफीचे वारे जवळपास एप्रिलपासूनच वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी चालू कर्ज व मागचेही कर्ज भरले नाही. परिणामी या शेतकºयांना नवीन कर्ज मिळाले नाही. कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा सक्तीचा आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांची संख्या घटल्याने विमाधारकांचीही संख्या घटली आहे. मागील वर्षी २२ हजार ९६७ कर्जधारकांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ कर्जधारकांनी विमा काढला आहे. मागील वर्षी कर्ज न घेणाºया ८१९ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी ८१५ शेतकºयांनी विमा काढला आहे. एकंदरीतच कर्ज न घेता विमा काढणाºया शेतकºयांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते.
सहा हजार शेतकºयांची पीक विम्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:30 PM
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.
ठळक मुद्देकर्जदारांना सक्ती : १७ हजार ७१७ शेतकरी योजनेत सहभागी