शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

वृक्षपे्रमींच्या मदतीकडे वन विभागाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:09 PM

वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ हेक्टरमध्ये वाढविले जंगल; भर्रीटोलावासीयांच्या पाच वर्षातील कार्याची दखलच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे. शासन वनसंरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती करीत आहे. असे असले तरी भर्रीटोला येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच वर्षांपूर्वी लगतच्या जंगलातील १५ हेक्टर जागेवर विविध प्रजातींच्या रोपांची लागवड श्रमदानातून केली. या रोपांचे संगोपन केले. सध्या ही या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. या कार्यातून भर्रीटोलावासीय जणू पर्यावरण दूतच बनले. मात्र त्यांच्या या श्रमयुक्त उपक्रमाची दख वनविभागाकडून घेण्यात आली नाही.कोरची तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या भर्रीटोला परिसरात २०१४ पूर्वी या गावातील लोकांना जंगलातील सरपण, जलाऊ लाकूड, इमारती लाकूड, बांबू मिळेनासा झाला होता. गावकऱ्यांनी सभा घेऊन या अडचणीवर मात करण्यासाठी शेजारील रिकाम्या शासकीय जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक बियांची जुळवाजुळव, रोपे तयार करणे आदी कामे करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागला. २०१४ मध्ये गावकºयांनी गावालगतच्या १५ हेक्टर शासकीय जागेत विविध प्रकारची रोपे लावली. ही सर्व कामे कुणाकडूनही मोबदला न घेता श्रमदानातून करण्यात आली.गावकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तर ते अधिक जोमाने काम करू शकतात, अशी भावना त्यांच्यात आहे. या अनोख्या कार्यात ग्रामसभेचे अध्यक्ष गोविंद होळी, कुमारसाय हलामी, सुकराम होळी, लक्ष्मण मडावी, सुरेश मुंगणकर,चंदरसाय हलामी, दशरथ मडावी, दीपक मडावी यांच्यासह सोगीबाई होळी, रैनाबाई होळी, मानबाई मडावी, सुंदराबाई होळी आदी महिलासुद्धा सहभागी आहेत.लोकवर्गणीतून केला खर्चजंगलात बांबू, आंबा, चिंच,जामून, करंजी, सीताफळ, गुलमोहर आदी रोपे लावली. लावलेली रोपे जनावरे खावू नयेत म्हणून संपूर्ण १५ हेक्टर सभोवताल काटेरी तारेचे कुंपन केले. उन्हाळ्यात रोपे मरू नयेत म्हणून पाणी देण्याची व्यवस्था केली. यावरील सर्व खर्च लोकवर्गणीतून केला. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात या परिसराला वणवे लागू दिले नाही. परिसरात नकळत वणवा लागल्यास तो विझविण्यासाठी गावकरी रात्री-बेरात्री धावून जात असत. आतासुद्धा हे कार्य सुरू आहे. याठिकाणी लावलेली रोपे १५ ते २० फुट उंच झाली आहेत. सुंदर असे जंगल तयार झाले आहे.जंगलात रमतात वन्यजीवभर्रीटोला जंगलाला लागूनच लहान ओढा आहे. येथील खड्ड्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे जंगलात ससा, हरिण, काळवीट, नीलगाय, बिबट, तडस यासह विविध प्रजातींची जनावरे व पक्षी आहेत. भीमपूर या गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावकºयांनी मागणी करूनही वनतलाव मिळाले नाही. पाणी अडविण्यासाठी योजनांचा लाभ मिळाला नाही. गावकºयांच्या या अतुलनीय श्रमाची अवहेलनाच होत आहे.

टॅग्स :forestजंगल